स्वागत आहे
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची
रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेस
रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल, 1453/54, सदाशिव पेठ, पुणे - 411030
म.ए.सो. रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेस
म.ए.सो ‘रेणुका स्वरूप इन्स्टिट्युट ऑफ करिअर कोर्सेस’ ही संस्था १९८९ पासून महिला सक्षमीकरणासाठी ओळखली जाते. ही संस्था विविध प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण देऊन महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम करते. आत्तापर्यंत हजारो महिलांनी येथून व्यवसाय प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे. अनेक जणी वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करत आहेत. स्वत: आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन त्यांनी इतर महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बद्दल
शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे वाटचाल राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमा पासून विविध कलांच्या प्रशिक्षणापर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्रविस्तारले आहे. आजमितीस ७ जिल्ह्यात असलेल्या संस्थेच्या ७४ शाखांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.