बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण (शासनमान्य कोर्स)

बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण (शासनमान्य कोर्स)

बालवाडी म्हणजे बालकाचे घर, बागडण्यासाठीचे अंगण! साधारणपणे बालक अडीच वर्षाचे झाल्यावर त्याला बालवाडीत घेतले जाते.इथेच खऱ्या अर्थाने त्याची समाजाशी ओळख व्हायला लागते. आईच्या मायेत, उबेत वाढणारे मूल प्रथमच ‘शाळा’ या अधिक विस्तृत वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. आई आणि घरापासून वेगळ्या वातावरणात रमताना त्याला आपलं स्वतःचं माणूस हवं असते. त्याच्या मनातली भीती पळवून लावणारी, आईसारखी मायाव प्रेम देणारी अशी व्यक्ती त्याला हवी असते. बालवाडीत ताईच्या रुपात ती त्याला मिळते. यासाठीच बालवाडी शिक्षिकेने प्रशिक्षण घेणे जरुरीचे असते. बालकांना हसत-खेळत शिक्षण देता येणे आवश्यक असल्याने शासनाचा ६महिन्यांचा बालवाडी कोर्स करणे गरजेचे आहे.

बालक हे सर्वसाधारणपणेतीन तासबालवाडीत असते.या वयात बालकाच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असते.त्याची जिज्ञासा, ग्रहणशक्ती, आकलनशक्ती जागृत झालेली असते. त्यामुळेच त्याला प्रत्येक गोष्टीबाबत कुतूहल असते. जे दिसेल (चांगलं-वाईट) ते टीपकागदासारखे टिपून घेण्याची वृत्ती असते. यासाठीच त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. याचे प्रशिक्षण बालवाडी कोर्समध्ये दिले जाते.बालकाचा सर्वांगीण विकास साधता येणाऱ्या बालवाडी शिक्षिका घडवणे हे या कोर्सचेउदिद्ष्ट असते. बालवाडीत येणारं प्रत्येक मूल हे वेगळं असतं. प्रत्येकाची ग्रहणशक्ती वेगळी असते. प्रत्येकाची‘गती आणि मती’ भिन्न असते. हे सगळेकसे ओळखायचे आणि त्याप्रमाणे प्रत्येक बालकाला कसे शिकवायचे, त्याला उमलू द्यायचे, त्याला समुहात आणि समाजात वावरायला कसे शिकवायचे? या सर्व कौशल्यांचे प्रशिक्षण बालवाडी कोर्समध्ये दिले जाते.

 

सहा महिन्यांच्या कालावधीत :

लेखी व प्रात्यक्षिक कामाचा भरपूर सराव.

शासनमान्य कोर्स असल्यामुळे सर्व नियम शासनाचे असतात.

 

कालावधी: ६ महिने

बॅच:

सोमवार ते शुक्रवार 

खास शिक्षिकांसाठी शनिवार बॅच 
 

बॅच:
जानेवारी ते जून

जुलै ते डिसेंबर

 

भरपूर सराव

गाणी गोष्टी, खेळ, हस्तकला, चित्रकला या प्रात्यक्षिकांचा भरपूर सराव .

 

लेखी व प्रात्यक्षिक काम मिळून एकूण १००० गुणांची परीक्षा-

 • बालमानसशास्त्र
 • बालशिक्षणाची कार्यपद्धती
 • बालआरोग्य व बालआहार
 • बालशिक्षणाचे सिद्धांत व शालेय व्यवस्थापन
 • बालकल्याण व समाजशिक्षण

[८० गुणांची लेखी व अंतिम परीक्षा आणि २० गुणांची चाचणी परीक्षा]

 

प्रात्यक्षिक काम- ५०० गुण

 • हस्तकला
 • चित्रकला
 • संगीत
 • शारीरिक शिक्षण
 • साधन निर्मिती

 

याशिवाय पाठांसाठी मार्गदर्शन-

 • भाषा
 • गणित
 • विज्ञान
 • कलानुभव
 • शारीरिक शिक्षण
 • जीवन व्यवहार

हे विषय कसे शिकवायचे यासाठी पाठाचे नियोजन केले जाते व त्याचे मार्गदर्शन केले जाते.

 

फायदे:-

 • नामांकित शाळॆत शिक्षिका म्हणून काम करू शकता. 
 • स्वतःची बालवाडी चालवू शकता.
 • बालभवनासारखे खेळ तुमच्या सोसायटीत, परिसरात घेऊ शकता.
 • सुट्टीत छंदवर्ग घेऊ शकता.
 • अंगणवाडी चालवू शकता.

यासर्वांसाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते, ती या कोर्समध्ये दिली जाते. आजची स्थिती पाहिली तर प्रत्येक स्त्रीने सक्षम होणे महत्त्वाचे आहे. बालवाडी हा पाया आहे. त्यासाठीच शासनमान्य कोर्सचे प्रशस्तिपत्रक असणे महत्त्वाचे आहे. मग…

 

घ्या उंच भरारी!

आमची साथ आहेच!!