सक्षम स्त्री, सक्षम देश

समन्वयकाचे मनोगत

संस्थेची भरारी उंच उंच जात असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. महिलांसाठी चालविली जाणारी आमची ही रेणुका करियर संस्था महिलांना स्वाभीमानाने आणि प्रतिष्ठेने उभी करत आहे. मुलींच्या स्त्रियांच्या कलागुणांना इथे वाव मिळतो त्यांच्याबरोबर ज्ञानालाही इथे अंकुर फुटतात. करियर मध्ये अनेक प्रकारचे नाविन्यपूर्ण शिक्षण दिले जाते. समाजात स्त्रियांना एक वेगळा दर्जा निर्माण करण्याचा इथे सातत्याने प्रयत्न केला जातो.

माणसाच्या प्रतिमेला तसे जीवनशैलीला एक वेगळे रूप देण्याचा प्रयत्न आम्ही इथे करत आहोत. ६४ कला मधल्या अनेक कलांचे अभिनव असे पाळणाघर प्रशिक्षण वर्षानुवर्षे चालू आहे. टीचर ट्रेनिंग कोर्स, बालवाडी प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, प्रूफ रीडिंग, हॉबी क्लासेस, स्पोकन इंग्लिश, जिम इन्स्ट्रक्टर, पाककला, स्मार्ट होम मेकर, कथ्थक. अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण एका अद्दयावत वास्तूत आम्ही देत आहोत सर्व प्रशिक्षणाला अत्यंत कमी फी आम्ही घेतो. स्त्रिया शिकल्या पाहिजेत स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत अशी आमची कायम भूमिका आहे. अनेक व्यक्ती अत्यंत कमी मानधनावर इथे आपले ज्ञानार्जन करतात ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. अशा व्यक्ती च्या जीवावर आम्ही प्रशिक्षण वर्ग मोठ्या व सुंदर रीतीने राबवतो. उदा. प्रूफ रीडिंग साठी माननीय विजय जोशी अत्यंत अल्प मानधन घेतात त्यामुळे हे वर्ग आमचे सत्याताने चालतात.

गुरूने दिला ज्ञानरूपी वसा पुढे चालवू हा वारसा अशा पद्धतीने इथे शिकलेल्या अनेक विद्यार्थीनी आपल देणे म्हणून आनंदाने इथे काम करतात.

प्रशिक्षणा बरोबर इथे प्रोडक्शन आम्ही सुरु केलेले आहे , बॅग्ज बनविणे, फ्रॉक्स बनविणे, रजई बनविणे, डिझायनर साड्या ड्रेसेस, ब्लाऊज , स्वेटर, शोभेच्या वस्तू, मसाले, तिळगुळवडी, दिवाळीचे पदार्थ अशा विविध प्रकारांचे प्रॉडक्शन तयार केले जाते त्यामुळे इथे रोजगार निर्मिती होते अनेक स्त्रियांना कामे मिळतात बचत गटांना कामे मिळतात माझे काम आणि मी असा नियम घातल्यामुळे चर्चा गप्पा यांना फाटे फुटतात. कमवा शिका स्वतःच्या पायावर उभे राहा. स्वच्छता टोपटीप नीटनेटकेपणा या गोष्टीवर इथे भर दिला जातो.

कलागुणांना जोपासून अर्थांजन करणे ही भूमिका करियर कोर्स सातत्याने मांडत आला आहे. महिला व मुलींनी या साऱ्याचा फायदा करून घेणे गरजेचे आहे. आपल्या कडे असणाऱ्या T. T. C व बालवाडी या कोर्सेस चे १००% प्लेसमेंट होते. मुली कोर्स चालू असतांना जॉबला लागतात. अश्या प्रकारे कोणताही कोर्स इथे केला तरी आत्मविश्वासाने उभ्या राहतात.समन्वयक,
म. ए. सो. रेणुका करियर इन्स्टीट्युट