म.ए.सो ‘रेणुका स्वरूप इन्स्टिट्युट ऑफ करिअर कोर्सेस’
म.ए.सो ‘रेणुका स्वरूप इन्स्टिट्युट ऑफ करिअर कोर्सेस’ ही संस्था १९८९ पासून महिला सक्षमीकरणासाठी ओळखली जाते. ही संस्था विविध प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण देऊन महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम करते. आत्तापर्यंत हजारो महिलांनी येथून व्यवसाय प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे. अनेक जणी वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करत आहेत. स्वत: आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन त्यांनी इतर महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
संस्थेची वैशिष्टये
- महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने स्थापन झालेली महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था
- व्यवसाय प्रशिक्षण देणारे विविध प्रकारचे कोर्सेस एकाच ठिकाणी
- प्रत्येक कोर्ससाठी संबंधित विषयाचे अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षक
- गुणवत्तेवर भर देऊन अभ्यासक्रमाची आखणी
- महिलांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पाहता त्यांच्या सोयीनुसार कोर्स पूर्ण करण्याची सुविधा
- स्त्रीने आपल्यातील कलागुणांना वाव देऊन सक्षम व्हावे, यासाठी संस्था प्रयत्नशील
- कोर्ट केसेस चालू असणाऱ्या आर्थिक, दुर्बल घटकांतील महिलांसाठी विशेष मार्गदर्शन व्यवसाय प्रशिक्षण देणारा ‘स्वयंसिद्धा’ हा महाराष्ट्रातील प्रथम उपक्रम
महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था असल्यामुळे विविध व्यवसाय प्रशिक्षणाबरोबर वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन संस्थेमार्फत करण्यात येते. अशा कार्यक्रमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळतो. संस्थेत येणाऱ्या बहुतांश महिला गृहिणी असतात. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना प्रशिक्षण देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यात संस्था यशस्वी ठरली आहे.