बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण कोर्स

पूर्व प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम कोर्स (शासनमान्य कोर्स)

बालक अडीच वर्षाचे झाल्यावर त्याला बालवाडीत घातले जाते. बालकांना हसत-खेळत शिक्षण देता येणे आवश्यक असल्याने बालवाडी शिक्षिकेने प्रशिक्षण घेणे जरुरीचे असते. बालवाडीत येणारं प्रत्येक मूल हे वेगळं असतं. प्रत्येकाची ग्रहणशक्ती वेगळी असते. प्रत्येकाची ‘गती आणि मती’ भिन्न असते. हे सगळे कसे ओळखायचे आणि त्याप्रमाणे प्रत्येक बालकाला कसे शिकवायचे, त्याला उमलू कसे द्यायचे, त्याला समूहात आणि समाजात वावरायला कसे शिकवायचे ? या सर्व कौशल्यांचे प्रशिक्षण बालवाडी कोर्समध्ये दिले जाते.

कालावधी : ६ महिने

  • सोमवार ते शुक्रवार
  • खास शिक्षकांसाठी शनिवार बॅच

पात्रता : १० वी पास

बॅचेस :

  • जानेवारी ते जून
  • जुलै ते डिसेंबर

अभ्यासाची पद्धत :

  • इन्स्टिट्यूटमध्ये प्रत्यक्ष येऊन (पुण्यातील प्रशिक्षणार्थींसाठी)

वैशिष्ट्ये :

  • अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षक
  • प्रात्यक्षिक विषयांचा भरपूर सराव
  • वैयक्तिक मार्गदर्शन
  • गाणी, गोष्टी, खेळ, हस्तकला, चित्रकला यांचा भरपूर सराव
  • सराव पाठांचे मार्गदर्शन
  • स्पोकन इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याचे प्रशिक्षण दिले जाते
  • प्लेसमेंटसाठी मार्गदर्शन केले जाते
  • विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित केल्या जातात

कोर्सचे फायदे :

  • आपल्या जवळच्या नामांकित शाळांमध्ये पूर्व-प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करू शकता
  • आपले स्वतःचे शिकवणी वर्ग सुरु करू शकता
  • आपली स्वतःची पूर्व-प्राथमिक शाळा सुरू करू शकता
  • आपले स्वतःचे बालभवन सुरू करू शकता किंवा बालभवन मध्ये शिक्षक म्हणून काम करू शकता
  • सुट्टीत छंद वर्ग घेऊ शकता
  • उन्हाळी शिबिरांचे आयोजन करू शकता
  • स्वतःची बालवाडी चालवू शकता
  • अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करू शकता

Leave a Comment

Govt Courses 2025


This will close in 20 seconds