कार्यक्रम आणि उपक्रम
भोंडला व दांडिया कार्यक्रम २०२४-२५
रेणुका स्वरूप इन्स्टिटयूट ऑफ करिअर कोर्सेस मध्ये बुधवार दि.१६ ऑक्टोबर २०२४ रोजी भोंडला व दांडियाचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाची सुरुवात रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनीअतिशय सुंदर पद्धतीने सादर केलेल्या पथनाट्याने झाली. हल्ली पाश्चिमात्य संस्कृती प्रमाणे वाढदिवस साजरे करण्याचे प्रमाण वाढले आहे. तर आपली संस्कृती आपल्याला काय सांगते त्याप्रमाणे वाढदिवसाच्या दिवशी काय काय करायला हवे हे सर्व या पथनाट्यातून सांगण्यात आले.
भोंडल्याची सुरुवात संचालिका मा. शुभांगी कांबळे व समन्वयिका मा.सारिका वाघ यांच्या हस्ते हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
भोंडल्याची गाणी गाण्यासाठी बालवाडी प्रशिक्षणार्थींनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यानंतर मुलींनी गरबा व दांडियाचा आनंद लुटला.
संचालिका मा.कांबळे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपण भोंडला का साजरा करतो, आपली संस्कृती व तिचे जतन हे महत्त्व पटवून दिले.
सर्वात शेवटी प्रत्येक विभागाची व इन्स्टिट्यूटची खिरापत ओळखून त्याचा सर्वांनी एकत्र बसून आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली लेले यांनी केले.
श्रावण सरी २०२४-२५
म.ए.सो. रेणुका स्वरुप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेस मध्ये दि.२१ ते २६ ऑगस्ट,या दिवसांत घेण्यात आलेल्या ‘श्रावण सरी’ या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कोर्सेस करण्यासाठी येणाऱ्या महिलांनी गीतगायन, वक्तृत्व, रांगोळी, मेंदी, हेअर स्टाईल, पाककला इत्यादी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्व स्पर्धांना त्या त्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती परीक्षक म्हणून लाभल्या. त्यांनी महिलांना प्रोत्साहित करून त्यांचा उत्साह वाढवला.
"Canva Flyer Making" व काव्य-वाचन या दोन नवीन स्पर्धा देखील यावर्षी घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे
गेल्यावर्षी नव्यानेच सुरु केलेली ‘श्रावण गौरी’ ही स्पर्धा यावर्षी देखील सर्वांचे खास आकर्षण ठरली.
या स्पर्धांच्या माध्यमातून इन्स्टिट्यूटमधील अनेक महिला पहिल्यांदाच स्टेजवर आल्या व आपली कला त्यांना सादर करता आली.
टीचर्स ट्रेनिंग कोर्स मध्ये प्रशिक्षण घेणारी *निकिता मोरे* हिने तिच्या प्रभावी भाषा प्रभुत्वाने व शेवटी विचारण्यात आलेल्या "संस्कार म्हणजे नक्की तुमच्या मते काय?" या परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचे सुंदर उत्तर देऊन सर्वांची मने जिंकली व *श्रावण गौरी* होण्याचा मान पटकावला.
या स्पर्धांमधून महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला. त्यांचा आत्मविश्वास वाढला. शेवटच्या दिवशी प्रशिक्षणार्थींनी खाऊचे स्टॉल लावले. सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला.
श्रावणसरी कार्यक्रमाचे बक्षीस वितरण व विविध कोर्सेस पूर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वितरण-म. ए. सो. च्या नियामक मंडळाच्या सदस्य व रेणुका स्वरुप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेस’ च्या अध्यक्षा मा.मैत्रीयी ताई देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमासाठी संचालिका मा. शुभांगी कांबळे मॅडम व समन्वयक सारिका वाघ उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता कुलकर्णी यांनी केले.
हा सर्व कार्यक्रम अतिशय उत्साहात व नियोजनबद्ध पार पडला.