कार्यक्रम आणि उपक्रम

संस्थेचा वर्धापन दिन

आबासाहेब गरवारे महाविध्यालायाच्या क्रीडांगणावर आयोजित केलेल्या वर्धापन दिन कार्यक्रमात नेल आर्ट, आर्टिफिशिअल बुके , कलाकुसरीच्या वस्तू व बॅग व ड्रेसचे पॅटर्न यांचा स्टॉल लावण्यात आला.

योग दिन

२१ जून जागतिक योग दिनाच्या दिवशी सर्व प्रशिक्षणार्थी उत्साहाने सहभागी होतात व योगासनाचे प्रात्यक्षिक करतात.

कौशल्यसेतू

रेणुका स्वरूप प्रशालेतील ९ वी व १० वी च्या विध्यार्थिनी कौशल्य विकसित करण्यासाठी कौशल्यसेतू हा उपक्रम घेतला जातो.

भोंडला

नवरात्रात भोंडल्याचे आयोजन केले जाते. सगळ्या प्रशिक्षणार्थी यामध्ये सहभागी होतात.

श्रावणसरी

श्रावण महिन्यात श्रावणसरी हा कार्यक्रम घेतला जातो. यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते महिलांच्या विविध कलागुणांना स्पर्धांमुळे वाव मिळतो. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक दिले जाते.

स्नेहसंमेलन

दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यामुळे मुलींना आपल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. यामुळे मुली खूप उल्हासित होतात.

Govt Courses 2025


This will close in 20 seconds